Rail Vikas Nigam Ltd: शेअर मार्केट (Stock Market) मध्ये अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या एका अशा शेअरबद्दल सांगणा आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा मिळवून दिला. IRCTC नंतर, Rail Vikas Nigam Ltd चे शेअर्स बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावत आहेत. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत. तसेच, कंपनीचा शेअर आपल्या सर्वाधिक पातळीवर ट्रेड करत आहे.
गेल्या 5 दिवसात 32% वाढ
आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच, आज(दि.) रेल्वे विकास प्राधिकरणाच्या शेअरमध्ये 9.35 टक्के वाढ झाली आहे. आज कंपनीचा शेअर 6.85 रुपयांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तसेच, गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये 32.04% वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीचा शेअर 19.45 रुपयांनी वाढला आहे.
6 महीन्यात 147.76% वाढ
जर एका महिन्याचा चार्ट पाहिला, तर कंपनीच्या शेअरमध्ये 97.17 टक्के म्हणजेच 39.50 रुपयांची वाढ झाली आहे. 28 ऑक्टोबरला कंपनीचा शेअर 40.65 रुपयांवर ट्रेड करत होता. तसेच, 6 गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 147.76 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 30 मे रोजी शेअरची किंमत 32.35 रुपये होती, तर आज 80.20 रुपये आहे.
(डिस्क्लेमर: इथे आम्ही फक्त शेअर्सच्या कामगिरीची माहिती देत आहोत. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)