Join us  

SA Tech Software India IPO: घसरत्या बाजारातही दुप्पट केले पैसे, ९०% प्रीमिअम लिस्टिंगनंतर 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:34 PM

SA Tech Software India IPO: अमेरिकेतील एस टेक कंपनीची आयटी कन्सल्टिंग सब्सिडायरी कंपनीच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली.

SA Tech Software India IPO: अमेरिकेतील एस टेक कंपनीची आयटी कन्सल्टिंग सब्सिडायरी एसए टेक सॉफ्टवेअर इंडियाच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. एसए टेक सॉफ्टवेअरचा शेअर शुक्रवारी ९० टक्क्यांनी वधारून ११२.१० रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ५९ रुपये होती. एसए टेक सॉफ्टवेअरची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कंपनीचा आयपीओ २६ जुलै २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि ३० जुलैपर्यंत खुला राहिला.

९० टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग

९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या शेअर्सनं ५ टक्क्यांचं अपर सर्किट गाठलं असून तो ११७.७० रुपयांवर पोहोचला आहे. एसए टेक सॉफ्टवेअरचे शेअर्स ५९ रुपयांच्या इश्यू प्राइसपासून जवळपास १०० टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू साइज २३.०१ कोटी रुपयांचा होता. मनोज जोशी आणि प्रियांका जोशी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. कंपनीत प्रवर्तकांचा ७९.२७ टक्के हिस्सा आहे.

६२१ पट झालेला सबस्क्राइब

एसए टेक सॉफ्टवेअरचा आयपीओ (S A Tech Software) ६२१.२५ पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ६२१.७७ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टमेंट (NII) श्रेणीचा हिस्सा ११७८.९७ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कोटा २०१.२९ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. एसए टेक सॉफ्टवेअरच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोलू शकणार होते. या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये ११८००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग