Lokmat Money >शेअर बाजार > Sakuma Exports Bonus Share : १ वर ४ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "अजूनही वाढणार..."

Sakuma Exports Bonus Share : १ वर ४ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "अजूनही वाढणार..."

Sakuma Exports Ltd Bonus Share: या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. दरम्यान, कंपनी १ शेअरवर ४ शेअर फ्री देणार आहे. यासाठी कंपनीनं आता रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:58 AM2024-08-07T11:58:06+5:302024-08-07T11:58:23+5:30

Sakuma Exports Ltd Bonus Share: या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. दरम्यान, कंपनी १ शेअरवर ४ शेअर फ्री देणार आहे. यासाठी कंपनीनं आता रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

Sakuma Exports Ltd company to give 4 bonus shares on 1 jumps of investors expert says Will continue to grow details | Sakuma Exports Bonus Share : १ वर ४ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "अजूनही वाढणार..."

Sakuma Exports Bonus Share : १ वर ४ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "अजूनही वाढणार..."

Sakuma Exports Ltd Bonus Share: सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचे शेअर्स आज बुधवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ३ टक्क्यांनी वधारला आणि ३१.२० रुपयांवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे बोनस शेअर्स हे कारण आहे. कंपनीने नुकतीच आपल्या भागधारकांना १:४ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती आणि आता त्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडने ४:१ गुणोत्तरात बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट १० ऑगस्ट निश्चित केली आहे. म्हणजेच या तारखेला कंपनीच्या पात्र भागधारकांना प्रत्येक शेअरवर कंपनीचे ४ शेअर्स मोफत मिळणार आहेत.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती

सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडचा शेअर इंट्राडे उच्चांकी ३१.२० रुपये आणि इंट्राडे नीचांकी ३०.४५ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ६५ टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभरात या शेअरमध्ये १२० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. २००६ पासून या शेअरनं ६२० टक्के परतावा दिला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. रिसर्च अॅनालिस्ट शेअर मार्केट टुडेचे (SMT) सहसंस्थापक अंबाला यांनी या शेअरची टार्गेट प्राईज ३५ ते ४५ रुपयांदरम्यान ठेवली आहे.

कंपनी व्यवसाय काय?

सकुमा एक्सपोर्टलिमिटेड (एसईएल) ही कापूस, साखर, कडधान्यं, खाद्यतेल, तेलबिया आणि इतर विशेष पिकांसह मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनांची एक प्रसिद्ध खरेदीदार, प्रोसेसर, मार्केटिंग, निर्यातदार आणि आयातदार आहे. ही कंपनी भारत, मध्य पूर्व, दक्षिण आणि आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आफ्रिकेतील कमोडिटीच्या गरजा पूर्ण करते. कंपनीचं मार्केट कॅप ९५७.५६ कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sakuma Exports Ltd company to give 4 bonus shares on 1 jumps of investors expert says Will continue to grow details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.