Sanofi India Ltd Dividend Stock: सनोफी इंडिया लिमिटेडनं (Sanofi India Ltd) पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. एका शेअरवर ११७ रुपयांचा लाभांश देण्यात येणार असल्याचे कंपनीनं म्हटलंय. लाभांशासाठी निश्चित केलेल्या रेकॉर्ड डेटसाठी फारशी वेळ शिल्लक राहिलेली नाही.
२५ एप्रिल रेकॉर्ड डेट
सनोफी इंडिया लिमिटेडनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पात्र गुंतवणूकदाराला एका शेअरवर ११७ रुपयाचा लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने या लाभांशासाठी २५ एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना लाभांश मिळणार आहे.
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
कंपनीनं गुंतवणूकदारांना २५ पेक्षा अधिक वेळा लाभांश दिला आहे. २००१ मध्ये पहिल्यांदा कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश दिला. तेव्हा कंपनीकडून एका शेअरवर ४ रुपये लाभांश देण्यात आला. तर २०२२ मध्ये कंपनीकडून सर्वाधिक लाभांश देण्यात आला होता. त्यावेळी गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८१ रुपयांचा अंतिम लाभांश आणि ३०९ रुपयांचा विशेष लाभांश दिला होता.
शेअर बाजारात कामगिरी कशी आहे?
गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ०.२९ टक्क्यांनी वधारून ६२२२.९५ रुपयांवर होता. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, वर्षभरात सनोफी इंडिया लिमिटेडचे शेअर्स १४ टक्क्यांनी वधारलेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७५९३.६० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४१४५.९० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
गेल्या पाच वर्षांत सनोफी इंडिया लिमिटेडचे शेअर्स २० टक्क्यांनी वधारले आहेत. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात १४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)