Join us  

तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस, तळवलकर हेल्थक्लबसह ७ जणांवर SEBI ची मोठी कारवाई, २.४६ कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 3:40 PM

भांडवली बाजार नियामक सेबीनं २ कंपन्या आणि ७ व्यक्तींवर २.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भांडवली बाजार नियामक सेबीनं २ कंपन्या आणि ७ व्यक्तींवर २.४६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांचाही या व्यक्तींमध्ये समावेश आहे. तसेच नियामकानं गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा भटकळ आणि गिरीश नायक यांना बाजारातून वेगवेगळ्या कालावधीसाठी बंदी घातली आहे.

कोणावर कारवाईतळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि तळवलकर्स हेल्थक्लब्स लि. या दोन कंपन्यांवर सेबीनं कारवाई केली आहे. गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा भटकळ हे या दोन्ही कंपन्यांचे प्रवर्तक आहेत.

...म्हणून घातली बंदीफ्रॉड अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसमुळे बाजार नियामकानं त्यांच्यावर ही बंदी घातली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यामुळं सेबीनं गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, अनंत गावंडे आणि हर्षा भटकळ यांना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विनायक गावंडे आणि मुधकर तळवकर यांना प्रत्येकी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गिरीश नायक यांना १८ लाखांचा दंड तर तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेडला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय.

१८ महिन्यांसाठी बंदीया सातही जणांना १८ महिन्यांसाठी मार्केटमधून बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही लिस्टेड कंपनीशी असोसिएटेड होण्यावरही मनाई करण्यात आलीये. सेबीकडे ऑगस्ट-ऑक्टोबर २०१९ दरम्यान यांच्याविरुद्ध अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या.

टॅग्स :सेबीशेअर बाजार