Lokmat Money >शेअर बाजार > NSDL IPO : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा

NSDL IPO : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा

NSDL IPO News : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाजार नियामक सेबीनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:43 PM2024-10-08T12:43:57+5:302024-10-08T12:44:42+5:30

NSDL IPO News : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाजार नियामक सेबीनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे.

sebi s approval IPO of NSDL country s largest depository Many giants including HDFC sbi will sell stake | NSDL IPO : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा

NSDL IPO : देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी NSDLच्या आयपीओला मंजुरी; HDFCसह अनेक दिग्गज विकणार हिस्सा

देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बाजार नियामक सेबीनं (SEBI) आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओला हिरवा कंदील दाखवला आहे. आयडीबीआय बँक (IDBI Bank), एनएसई (NSE), एसबीआय (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank) एनएसडीएलच्या ५७,२६०,००१ शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमध्ये आपला हिस्सा विकणार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये एनएसडीएलने आयपीओसाठी बाजार नियामकाकडे कागदपत्रं सादर केली होती. यावेळी दिग्गज खासगी बँक एचडीएफसी बँकेनं एनएसडीएलमधील २ टक्के हिस्सा ओएफएसच्या माध्यमातून विकण्याची घोषणा केली होती.

कोणाचा किती हिस्सा?

एनएसडीएलमध्ये आयडीबीआय बँकेचा २६ टक्के, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) २४ टक्के हिस्सा आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचा ५ टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाचा २.८ टक्के आणि कॅनरा बँकेचा २.३ टक्के हिस्सा आहे.

कर्मचाऱ्यांसाठी शेअर्स राखीव

या आयपीओमध्ये ५७,२६०,००१ इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत आयडीबीआय बँकेकडून २२,२२०,००० इक्विटी शेअर्स, एनएसईद्वारे १८,०००,००१ इक्विटी शेअर्स, युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे ५,६२५,००० इक्विटी शेअर्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ४०,००,००० इक्विटी शेअर्स विकले जातील. या आयपीओमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी ठराविक इक्विटी शेअर्स राखीव असतील.

देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी

एनएसडीएल फायनान्स आणि सिक्युरिटी मार्केॉसाठी विविध प्रकारची उत्पादनं आणि सेवा प्रदान करते. १९९६ मध्ये डिपॉझिटरी अॅक्ट लागू झाल्यानंतर एनएसडीएलनं भारतातील सिक्युरिटीजचं डिमॅटरियलायझेशन हाती घेतलं. जारीकर्त्यांची संख्या, सक्रिय साधनांची संख्या, सेटलमेंट व्हॉल्यूमच्या डीमॅट मूल्यातील बाजारातील हिस्सा आणि असलेल्या मालमत्तेचं मूल्य या बाबतीत ही कंपनी भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: sebi s approval IPO of NSDL country s largest depository Many giants including HDFC sbi will sell stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.