Join us

अनिल अंबानी यांचा पाय पुन्हा खोलात! रिलायन्स हाउसिंग फायनान्यसह ६ कंपन्यांना सेबीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:58 AM

Anil Ambani : या कंपन्यांनी दंड न भरल्याने डिमांड नोटीस पाठवण्यात आली आहे. सेबीने सर्व ६ कंपन्यांना प्रत्येकी २५.७५ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं समोर आलं आहे. शेअर बाजार नियामक सेबीने बुधवारी रिलायन्स हाउसिंग फायनान्सच्या प्रवर्तक घटकासह ६ कंपन्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांना १५४.५० कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी कंपनीला ही नोटीस देण्यात आली आहे. सेबीने या युनिट्सना १५ दिवसांत पैसे भरण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास या कंपन्यांची मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याचा इशारा दिला आहे.

या कंपन्यांना पाठवली नोटीसज्या कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यात क्रेस्ट लॉजिस्टिक अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड (आता सीएलई प्रायव्हेट लिमिटेड), रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्स लिमिटेड आणि रिलायन्स क्लिन्जेन लिमिटेडचा समावेश आहे.

प्रत्येक कंपनीला २५.७५ कोटी रुपये द्यावे लागणारया कंपन्यांनी दंड न भरल्याने डिमांड नोटीस पाठवण्यात आली आहे. सेबीने सर्व ६ कंपन्यांना प्रत्येक कंपनीला २५.७५ कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये व्याज आणि वसुलीच्या खर्चाचा समावेश आहे. थकबाकी न भरल्यास सेबी या युनिट्सच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री करुन रक्कम वसूल करेल. याशिवाय त्यांची बँक खातीही गोठवण्यात येतील, असा इशा इशारा दिला आहे.

अनिल अंबानींना ठोठावला होता २५ कोटी रुपयांचा दंडया वर्षी ऑगस्टमध्ये, सेबीने उद्योगपती अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्सचे माजी प्रमुख अधिकारी आणि इतर २४ संस्थांवर कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल ५ वर्षांसाठी सिक्युरिटी मार्केटमधून बंदी घातली होती. नियामकाने अनिल अंबानी यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच सेबीकडे नोंदणीकृत कोणत्याही लिस्टिंग कंपनी किंवा मध्यस्थांमध्ये संचालक किंवा व्यवस्थापन स्तरावरील प्रमुख पदांवर राहण्यास ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. यासोबतच सेबीने रिलायन्स होम फायनान्स लि.ला रोखे बाजारात ६ महिन्यांसाठी बंदी घातली होती. शिवाय ६ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

टॅग्स :अनिल अंबानीसेबीरिलायन्स