Lokmat Money >शेअर बाजार > SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:05 PM2024-10-08T16:05:42+5:302024-10-08T16:05:42+5:30

SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय?

SEBI sent notice to more than 100 stock brokers algo trading brokers what is the reason find out | SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI Action On Brokers : सेबी (Sebi) १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर (Stock Brokers) कठोर पावलं उचलताना दिसत आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या यादीत अनेक मोठी नावे आहेत. सेबीने ही नोटीस अल्गो मार्केटप्लेस ट्रेडट्रॉनशी संबंधित असण्यासाठी पाठवली आहे. यातील काही स्टॉक ब्रोकर्सनी अल्गो मार्केटप्लेस ट्रेडट्रॉनसोबतचे संबंध संपुष्टात आल्याचं प्रतिज्ञापत्र दिले होतं. परंतु पाठवलेल्या नोटिसनुसार त्यांनी तसं केलेलं नाही.

सेबीने ही नवीन नोटीस ट्रेडट्रॉन आणि इतर अल्गो प्लॅटफॉर्मच्या चौकशीचा एक भाग असल्याचं म्हटलंय. रिपोर्टनुसार, सेबीनं गेल्या आठवड्यात ही नोटीस जारी केली होती.

सेबीच्या नियमांचे उल्लंघन

ट्रेडट्रॉन आपल्या संकेतस्थळावर परताव्याची हमी देत असल्याचं नियामकाच्या निदर्शनास आलं आहे. अशा प्लॅटफॉर्म्ससोबत स्टॉक ब्रोकर्सचा संबंध सेबीनं जारी केलेल्या २ सप्टेंबर २०२२ च्या नियमांचे उल्लंघन आहे. ११९ ब्रोकर्सनं परिपत्रकाचं पालन करीत असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचं नियामकाच्या निदर्शनास आलं. यानंतर ट्रेडट्रॉनसोबतचे नातं संपुष्टात येणं आवश्यक होतं. 

सल्ला देऊनही ब्रोकर्सनं आपले एपीआय ट्रेडट्रॉनशी जोडलेले ठेवले आहेत. ट्रेडट्रॉन अल्गो आणि ब्रोकिंग प्लॅटफॉर्म दरम्यान ते एका पुलासारखं काम करतं, असं सेबीच्या नोटीसमध्ये म्हटलंय.

Web Title: SEBI sent notice to more than 100 stock brokers algo trading brokers what is the reason find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.