Join us  

शेअर असावा तर असा...! या 35 पैशांच्या शेअरनं केली कमाल; 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 कटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 11:24 PM

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत तब्बल 158185% पेक्षाही अधिकचा परतावा देऊन चकित केले आहे.

आज आम्ही आपल्याला अशाच एका मल्टीबॅगर शेअरसंदर्भात सांगत आहोत, ज्या शेअरने केवळ दोनच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्याची कमाल केली आहे. हा शेअर आहे, एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचा (Sel Manufacturing Company Ltd). या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत तब्बल 158185% पेक्षाही अधिकचा परतावा देऊन चकित केले आहे. पण, गेल्या सहा महिन्यांपासून हा शेअर प्रेशरमध्ये आहे. या काळात या शेअरमध्ये 41.42% ची घसरण जाली आहे. तर सोमवारी, एनएसईवर 5% नी घसरून हा शेअर 554.10 रुपयांवर बंद झाला.

35 पैशांवरून 862.25 वर पोहोचला स्टॉक - SEL Manufacturing Company Ltd  च्या शेअर प्राईस हिस्ट्रीनुसार, हा शेअर एनएसईवर 35 पैशांवरून (27 ऑक्टोबर 2021 चा बंद भाव) वाढत जाऊन 9 जानेवारी 2023 रोजी 554.10 रुपयांवर पोहोचला. या काळात कंपनीच्या शेअरने जवळपास 158185.71 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. याच बरोबर गेल्या एका वर्षात हा शेअर 80.71% नी वाढला आहे.

गुंतवणूकदार झाले कोट्यधीस - एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडची शेअर प्राईस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 35 पैशांप्रमाणे गुंतवणूक केली असती, तर आता ते वाढून 16 कोटी रुपये झाले असते. महत्वाचे म्हणजे, कंपनी कर्जात बुडालेली आहे आणि गेल्या बऱ्याच दिवसांपर्यंत हिचे ट्रेडिंगदेखील बंद आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक