शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात बुधवारी तेजीसह झाली आणि निफ्टी आणि सेन्सेक्सने नव्या उच्चांकी स्तराकडे वाटचाल केली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंकांच्या वाढीसह २४४६० च्या पातळीवर उघडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १३० अंकांनी वधारून ८०४८१ च्या पातळीवर उघडला. मात्र त्यानंतर काहीच वेळात त्यात मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान निफ्टी ६० अंकांनी तर सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरला.
बाजार उघडताच उच्चांकी स्तरावरून विक्रीचा दबाव दिसून येत असून व्यवहाराच्या पहिल्या पाच मिनिटांतच निफ्टी आणि सेन्सेक्सने सुरुवातीची तेजी गमावली. सुरुवातीच्या व्यवहारात ग्रासिम इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, टायटन कंपनी, ब्रिटानिया, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स या कंपन्यांचे शेअर्स निफ्टी ५० टॉप गेनरच्या यादीत दिसून आले.
महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, कोटक, इन्फोसिस आणि डॉक्टर रेड्डीज या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात विक्री दिसून आली. ऑटो निर्देशांक, रिअल इस्टेट, ऑईल अँड गॅस क्षेत्रात आज खरेदी दिसून येत आहे. बँकिंग क्षेत्रात काही प्रमाणात विक्री दिसून येत आहे.