Senco Gold IPO Listing: सेन्को गोल्ड लिमिटेडच्या IPO नं आज शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. BSE मध्ये कंपनीची लिस्टिंग 35.96 टक्के प्रीमियमवर म्हणजेच 431 रुपयांवर झाली. ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स अलॉट झाले होते त्यांना प्रति शेअर 114 रुपये नफा झाला आहे. यापूर्वी, आयडियाफोर्ज आणि Cyient च्या आयपीओनंदेखील गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं.
हा आयपीओ 4 जुलै रोजी खुला झाला. गुंतवणूकदारांना 6 जुलै 2023 पर्यंत सबस्क्राईब करण्याची संधी होती. कंपनीने सेन्को गोल्ड आयपीओचा प्राईज बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति शेअर निश्चित केली होता. सेन्को गोल्ड आयपीओची लॉट साइज 47 शेअर्सची होती. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,899 रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
सेन्को गोल्ड आयपीओच्या सुरुवातीच्या दिवशी गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी सबस्क्राईब केलं होतं. सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये अनुक्रमे 0.75 पट आणि 2.85 पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. अखेरच्या दिवशी हा आयपीओ 77.25 पट सबस्क्राईब झाला होता.