Lokmat Money >शेअर बाजार > Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी

Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी

Senco Gold Share : सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १५४४ रुपयांवर पोहोचला. १५ महिन्यांत ३५० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:23 PM2024-10-07T13:23:00+5:302024-10-07T13:24:21+5:30

Senco Gold Share : सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १५४४ रुपयांवर पोहोचला. १५ महिन्यांत ३५० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी.

Senco Gold Jewelery Company Announces Share Split stock price up by 10 percent Record level reached | Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी

Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी

Senco Gold Share : ज्वेलरी कंपनी सेन्को गोल्डच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर जवळपास १० टक्क्यांनी वधारून १५४४ रुपयांवर पोहोचला. सेन्को गोल्डच्या शेअरनं आज उच्चांकी पातळी गाठली. शुक्रवारी कंपनीचा शेअर १४०४.४५ रुपयांवर बंद झाला. ज्वेलरी कंपनीने शुक्रवारी शेअर स्प्लिटची घोषणा केली. गेल्या १५ महिन्यांत सेन्को गोल्डचे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राइसपेक्षा ३५० टक्क्यांनी वधारले आहेत.

दोन शेअर्समध्ये स्प्लिट

सेन्को गोल्डनं आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनी १० रुपयांच्या फेल व्हॅल्यूच्या शेअरची ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या २ शेअर्समध्ये विभागणी करत आहे. पहिल्यांदाच कंपनी आपले शेअर्स स्प्लिट करत आहे. सेन्को गोल्डचा आयपीओ ४ जुलै २०२३ रोजी उघडला आणि ६ जुलैपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ३१७ रुपये होती. सेन्को गोल्डचा शेअर ७ ऑक्टोबर २०२४ रोजी १५४४ रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स ३१७ रुपयांच्या इश्यू प्राइजपेक्षा ३५० टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीनं अद्याप शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

५०० कोटींपर्यंत निधी उभारण्याची तयारी

सेन्को गोल्डच्या संचालक मंडळानं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) किंवा विविध योग्य पद्धतींद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. सेन्को गोल्डच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ११० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर शेअर्समध्ये गेल्या ६ महिन्यांत ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात सेन्को गोल्डच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १५४४ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५७६.५० रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

Web Title: Senco Gold Jewelery Company Announces Share Split stock price up by 10 percent Record level reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.