Lokmat Money >शेअर बाजार > महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash : बाजारातील घसरण इतकी झपाट्याने झाली की सेन्सेक्स १८०० हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी २५,३०० अंकांच्या खाली गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:55 PM2024-10-03T15:55:28+5:302024-10-03T16:01:04+5:30

Stock Market Crash : बाजारातील घसरण इतकी झपाट्याने झाली की सेन्सेक्स १८०० हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी २५,३०० अंकांच्या खाली गेला.

sensex and nifty huge fall in share market four reasons oil price middle east conflict and china factor | महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash : इराण आणि इस्रायल देशांतील तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. यातून भारतीय शेअर बाजारही सूटला नाही. काल बुधवारी शेअर बाजारात पडझडीला सुरुवात झाली. कालच्या सत्रात बाजार १२०० अंकांनी घसरला होता. हा धक्का सहन करत असतानाच आज बाजारात त्सुनामी आली. युद्धाचं सावट आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आज १८०० तर निफ्टी ५५० हून अधिक अंकांनी घसरला. बँकिंग, एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये वेगाने झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली. जागतिक आणि देशांतर्गत ट्रिगर्समुळे बाजारात मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स सुमारे १८०० अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्ये १००० अंकांची घसरण झाली. निफ्टीवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही दोन ते अडीच टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २ शेअर्स वाढीसह तर २८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या ५० स्टॉक्सपैकी फक्त ४ शेअर्स वाढत आहेत तर ४६ शेअर्स घसरत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील १.७६ टक्के, टाटा स्टील ०.३० टक्के, ओएनजीसी ०.१९ टक्के, डॉ रेड्डी ०.०३ टक्के तेजीसह व्यवहार करत आहे. घसरणाऱ्या शेअर्समध्ये एल अॅण्ड टी ४१.४ टक्के, मारुतु सुझुकी ४.०५ टक्के, एशियन पेंट्स ४.०४ टक्के, रिलायन्स ३.७५ टक्के, ॲक्सिस बँक ३.७० टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.७० टक्के, बजाज फायनान्स ३.६७ टक्के घसरला आहे.

गुंतवणूकदारांचे १० लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान
बाजारातील घसरणीच्या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप १०.५८ लाख कोटी रुपयांनी घसरून ३६४.२८ लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या सत्रात ३७४.८६ लाख कोटी रुपये होते.

शेअर बाजार का पडला? 
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जगभरातील शेअर्सवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारही त्याच्या प्रभावापासून दूर राहिला नाही. मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तणावामुळे ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या जवळ पोहोचली, ज्यामुळे भारतीय बाजार घसरला. अशीच परिस्थिती राहिली तर देशात पेट्रोल डिझेलच्या दराही वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: sensex and nifty huge fall in share market four reasons oil price middle east conflict and china factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.