Join us

Sensex ७२३०० च्या, तर निफ्टी २२००० जवळ ओपन; Paytm पुन्हा आपटला; NSE साईटही डाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:06 AM

सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर ३० पैकी १९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ११ शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Stock Market Opening: सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट राहिली. कामकाजादरम्यान १० च्या सुमारास सेन्सेक्समध्ये मोठी तेजी दिसून आली. यादरम्यान सेन्सेक्समध्ये २३८ अंकांची वाढ होऊन तो ७२३२० च्या जवळ पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये ९० अंकांची वाढ होऊन तो २१९४४ अंकांवर पोहोचला होता. 

सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर ३० पैकी १९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ११ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सर्वाधिक सेन्सेक्स वाढणाऱ्यांपैकी टाटा मोटर्स ६.८३ टक्के आणि एम अँड एम १.७२ टक्क्यांनी अप आहे. सन फार्मा १.४३ टक्के, टाटा स्टील १.४१ टक्क्यांनी वधारले. एनटीपीसी ०.९२ टक्क्यांच्या वाढीसह तर एशियन पेंट्स ०.८२ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील २४३ शेअर्सना अपर सर्किट तर ७४ शेअर्सना लोअर सर्किट लागलं. तर दुसरीकडे पेटीएमच्या शेअरला आजही १० टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं.  

एनएसई निफ्टीच्या शेअर्सची स्थिती 

सकाळी कामकाजादरम्यान एनएसईची साईट डाऊन झाल्याचं दिसलं. एनएसई इंडियाची वेबसाईट डाऊन झाल्यानं ट्रेडर्स आणि इनव्हेस्टर्सना लाइव्ह इंडायसेज आणि स्टॉक्स ट्रॅक करण्यात समस्या येत आहेत. अन्य ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार निफ्टीच्या ५० पैकी ४० शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १६ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार