Join us  

Sensex ६१२ तर Nifty २०३ अंकांच्या तेजीसह बंद, पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:05 PM

बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 612 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

Closing Bell: मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर बुधवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 612 अंकांच्या वाढीसह 71752 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203 अंकांच्या वाढीसह 21725 अंकांच्या पातळीवर बंद झाला. 

बुधवारी शेअर बाजारात डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली, तर आयशर मोटर, सन फार्मा आणि टाटा मोटर्सचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. लार्सन अँड टुब्रो, टायटन, बीपीसीएल आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये  सर्वाधिक घसरण दिसून आली. देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन कंपनी मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मारुती सुझुकी कंपनीचा एकत्रित नफा 33 टक्क्यांनी वाढून 3260 कोटी रुपये झाला आहे, तर महसूल 15 टक्क्यांनी वाढून 33,512 कोटी रुपये झाला आहे. 

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात घसरण दिसून आल्यानंतर दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये राहिले. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी प्रत्येकी एक टक्का वाढीसह बंद झाले. बुधवारी निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांनी वाढ नोंदवली. 

कोणते शेअर्स वधारले / घसरले 

कामकाजादरम्यान डॉ. रेड्डीज लॅब्स, आयशर मोटर्स, डिव्हीज लॅब, सन फार्मा, टाटा मोटर्स, सिप्ला आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर लार्सन अँड टुब्रो, टायटन, बीपीसीएल, टाटा कंझ्युमर यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज, सन फार्मा, टाटा मोटर्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, पॉवर ग्रिड आणि बजाज ऑटो यांचे समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. निफ्टी निर्देशांकाबद्दल बोलायचे तर जवळपास सर्वच निर्देशांक ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार