Join us  

मोठ्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह, तर निफ्टी घसरणीसह बंद; बँक निफ्टीत मोठी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 3:56 PM

शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान बुधवारी मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. बुधवारी अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स ३६ अंकांच्या मजबुतीसह ७७३३८ वर बंद झाला.

शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान बुधवारी मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. बुधवारी अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स ३६ अंकांच्या मजबुतीसह ७७३३८ वर बंद झाला, तर निफ्टी ४२ अंकांनी घसरून २३५१६ अंकांवर बंद झाला.  

कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ईआयडी पॅरी, ज्युबिलंट इन ग्रॅव्हिया, आलोक इंडस्ट्रीज, त्रिवेणी इंजिनीअरिंग, श्री रेणुका शुगर, राष्ट्रीय केमिकल्स आणि सनटेक रियल्टी या शेअर्सचा समावेश आहे. तर टॉप लूजर्सच्या श्रेणीत सोभा, वेबको इंडिया, केईआय इंडस्ट्रीज, माझगाव डॉक, जेके पेपर आणि झी एंटरटेनमेंट सारख्या शेअर्सचा समावेश आहे. बँक निफ्टीनं बुधवारी दिवसभराच्या व्यवहारात प्रथमच ५१९०० ची पातळी गाठली आणि नंतर तो ५१३९८ च्या पातळीवर बंद झाला. 

आयटी, बँक इंडेक्समध्ये तेजी 

शेअर बाजाराच्या कामकाजात दिवसभरात अनेक चढ-उतार नोंदवले गेले. निफ्टी आयटी निर्देशांकात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली, तर निफ्टी बँक निर्देशांक दोन टक्क्यांच्या वाढीवर बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही तेजी नोंदविण्यात आली, तर निफ्टीचे इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. 

मल्टीबॅगर स्टॉकची स्थिती 

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबाबत बोलायचं झालं तर कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेकचे शेअर्स वधारून बंद झाले, तर टीसीएस, एशियन पेंट, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, अशोक लेलँड, लार्सन, टॅक्स मेको रेल आणि जेके पेपर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. 

पीएसयू शेअर्सची स्थिती काय? 

टीटागड रेल, रेल विकास निगम, एनएमडीसी लिमिटेड, एसजेव्हीएन, आयआरएफसी, एनएचपीसी, इंडियन रेल्वे केटरिंग, रेलटेल कॉर्पोरेशन, एनटीपीसी, कोल इंडिया, राइट्स लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल, गेल इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोचीन शिपयार्ड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, वेस्ट कोस्ट पेपर मिल्स, कंटेनर कॉर्पोरेशन, भारत डायनॅमिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, बीईएमएल, गार्डन रीच आणि माझगाव डॉकचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार