देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 100.26 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 65,880.52 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 36.15 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 19,611.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवरील टाटा कंझ्युमरचे शेअर्स सर्वाधिक 4.11 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्याचप्रमाणे डिव्हिस लॅब्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि ब्रिटानिया यांचे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. त्याच वेळी टाटा स्टील, हिंदाल्को आणि अॅक्सिस बँकेचं शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.
जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोललो तर एफएमसीजी निर्देशांकात एका टक्क्याची वाढ झाली आहे. त्याचवेळी फार्मा, ऑइल अँड गॅस आणि पॉवर निर्देशांक 0.5-0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, मेटल, रिअल इस्टेट आणि बँक निर्देशांक 0.4-1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये तेजी
बीएसई सेन्सेक्सवर भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक 1.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टायटन, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसीचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय सन फार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, नेस्ले इंडिया आणि रिलायन्सचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर टाटा स्टील, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, इन्फोसिस आणि टाटा मोटर्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
रुपया घसरला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी घसरुन 83.13 वर आला. यापूर्वी मंगळवारी तो 83.03 च्या पातळीवर बंद झाला होता.