Closing Bell Today : मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी उत्तम ठरला. बीएसई सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 72219 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 167 अंकांच्या वाढीसह 21938 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात बंपर वाढ झाली, तर निफ्टी बँक निर्देशांक थोड्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांकातही किंचित घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी फार्मा आणि निफ्टी ऑटो निर्देशांकही वाढीसह बंद झाले.
मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली तेजी दिसून आली आणि बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, एचसीएल टेक, टीसीएस, मारुती सुझुकी, विप्रो, ओएनजीसी, एसबीआय लाइफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर वाढ नोंदवण्यात आली. शेअर्समध्ये घसरण झालेल्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर पॉवर ग्रिड, ब्रिटानिया, इंडसइंड बँक, आयटीसी, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
यूपीएल, पेटीएम नीचांकी स्तरावर
एसबीआय कार्ड, नवीन फ्लोरिन, यूपीएल, पेटीएम, विनती ऑरगॅनिक्स आणि शारदा क्रॉप कॅमचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. जर आपण गौतम अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोललो तर या सर्व कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. अदानी विल्मरच्या शेअरमध्ये सर्वात कमी वाढ झाली होती तर अदानी ग्रीन एनर्जीमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
पतंजली फूड्स, मारुती सुझुकी, इन्फोसिस, आयआरसीटीसी, मुथूट फायनान्स आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर बजाज फायनान्स, फेडरल बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, गार्डन रीच शिप बिल्डर, देवयानी इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कामकाजादरम्यान घसरण दिसून आली.
तर दुसरीकडे पंजाब अँड सिंध बँक, ओम इन्फ्रा, एनएमडीसी, स्टोव्ह क्राफ्ट, ब्रँड कॉन्सेप्ट आणि एक्साइड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आली. तर एचडीएफसी बँक, नेस्ले, ग्लोबस स्पिरिट, युनि पार्ट्स, कोटक महिंद्रा बँक, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, जिओ फायनान्शिअलही घसरणीसह बंद झाले.