Join us

Sensex Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; मेटल शेअर्स चमकले, हिदाल्कोत तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 4:20 PM

Sensex Closing Bell: शेअर बाजारातील व्यवहार बुधवारी तेजीसह बंद झालं. BSE सेन्सेक्स 115 अंकांनी वाढून 73853 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Sensex Closing Bell: शेअर बाजारातील व्यवहार बुधवारी तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 115 अंकांनी वाढून 73853 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 45 ​​अंकांनी वधारून 22413 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी एफएमएसजी निर्देशांकात किंचित वाढ झाली. निफ्टी ऑटो निर्देशांकातही किंचित घसरण दिसून आली. निफ्टी स्मॉल कॅप 50 आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक देखील घसणीसह बंद झाले, तर निफ्टी मीडिया निर्देशांकातही किंचित घसरण नोंदवली गेली. 

निफ्टी ऑटो-निफ्टी आयटीमध्ये घसरण 

बुधवारी दिवसभर शेअर बाजाराचे कामकाज ग्रीन झोनमध्ये सुरू होतं. शेअर बाजारात निफ्टी आयटी निर्देशांकात किंचित घसरण नोंदवली गेली आणि निफ्टी ऑटो निर्देशांकही किरकोळ घसरून बंद झाला. याशिवाय निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली. 

आज टॉप गेनर्स आणि लूजर्स 

शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक बँक आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, ग्रासिम इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ, टीसीएस, टेक महिंद्रा आणि अदानी एंटरप्रायझेसचा समावेश होता.  

शेअर बाजाराच्या कामकाजात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे तर गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी तीन लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वधारले तर सात कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पॉवरचे शेअर्स टक्क्यांनी घसरून तर एसीसी लिमिटेड 4.5 टक्क्यांनी वाढून बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार