Join us

Share Market Opening Bell: गुंतवणूकदारांसाठी 'ब्लॅक मंडे'; शेअर बाजार तब्बल १२०० अंकांनी कोसळला, निफ्टीही घसरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:11 AM

Share Market, Sensex Down: शेअर बाजाराची या आठवड्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे.

Share Market, Sensex Down: शेअर बाजाराची या आठवड्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्री-ओपनिंग निर्देशांक तब्बल १२०० अकांनी कोसळला आहे. तर निफ्टीतही ३५० अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहेत. 

अमेरिकेच्या शेअर बाजारात शुक्रवारी शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली होती. अमेरिका सध्या महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले. त्यानंतर बाजारात गहजब झाला. शुक्रवारी अखेरच्या सत्रात गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा सपाटा लावला. याचा परिणाम आज भारतीय बाजारावर पाहायला मिळू शकेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

भारतीय शेअर बाजाराच्या आजच्या प्री-ओपनिंग सत्रात १२०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्स १०६९ अंकांच्या घसरणीसह ५७,७५३.६१ अंकांवर होता. तर निफ्टी ३१४ अंकांच्या घसरणीसह १७,२४४.४५ अंकांवर व्यवहार करत होता.

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजार