Stock Market closing Results Today : जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे शुक्रवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजाराचा निर्देशांक 458 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 19,300 अंकांवर बंद झाला. जिओ फायनान्शियलच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली, तर व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर दुसरीकडे शॉपर्स स्टॉप 13 टक्के आणि जीएमआर एअरपोर्ट जवळपास 5 टक्क्यांनी घसरला.
शुक्रवारी सेन्सेक्स 457.41 अंक किंवा 0.70% घसरून 64,794.93 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी-50 देखील 143.70 अंक किंवा 0.74% घसरून 19,243 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर केवळ सात शेअर्स किरकोळ वाढीनंतर बंद झाले.
या शेअर्समध्ये वाढव्होडाफोन आयडियानं शुक्रवारी टॉप गेनर्समध्ये स्थान मिळवलं कंपनीचा शेअर 9.43 टक्क्यांनी वधारला. तर आशी इंडिया ग्लास 9.42 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स 8.91 टक्क्यांनी वधारले. फर्स्ट सोर्स सोल्युशन्सचे शेअर्स 7.44 टक्के आणि सेरी सॅनिटरीवेअर 5.75 टक्क्यांनी वाढले.
यामध्ये घसरणशुक्रवारी कामकाजाच्या अखेरीस शॉपर्स स्टॉपचा शेअर सर्वाधिक 12.71 टक्क्यांनी घसरला. गल्फ ऑइल लुब्रिकंट्स 9.54 टक्के आणि डीएसजे कीपचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, जीएमआर एअरपोर्ट 4.16 टक्के आणि बीईएमएलचे शेअर्स 3.94 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे लार्सन टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा यांचेही शेअर्स घसरणीसह बंद झाले.