गुरुवारी शेअर बाजारात थोडी घसरण दिसून आली. विशेषत: आयटी कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण दिसून आली. याशिवाय इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारला. गुरुवारी सेन्सेक्स 64 अंकांनी घसरून बंद झाला. तर दुसरीकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली आणि दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 0.30 टक्के आणि 0.60 टक्क्यांनी वाढले. ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 56 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 64.66 अंक किंवा 0.097 टक्क्यांनी घसरून 66,408.39 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 27.50 अंक किंवा 0.14 टक्क्यांच्या घसरणीसह 19,783.85 वर बंद झाला.गुंतवणूकदारांनी कमावले 56 हजार कोटीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 12 ऑक्टोबर रोजी वाढून 322.17 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी 321.61 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर लिस्डेट कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 56 हजार कोटी रुपयांनी वाढले. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 56 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये वाढसेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.73 टक्के वाढ झाली. तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स जवळपास 0.82 टक्के ते 1.18 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.या शेअर्समध्ये घसरणतर सेन्सेक्समधील उर्वरित 12 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी टेक महिंद्राचे शेअर्स 2.72 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स 1.03 टक्क्यांपासून 1.95 टक्क्यांपर्यंत घसरले.