Join us  

सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा अधिक घसरला, निफ्टीतही घसरण; बजाज फायनान्समध्ये तेजी; TCS आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 9:38 AM

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 418 अंकांच्या कमजोरीसह 72,330 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता .

Stock Market Open: शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. BSE सेन्सेक्स 418 अंकांच्या कमजोरीसह 72,330 अंकांच्या पातळीवर कामकाज करत होता तर, निफ्टी 122 अंकांनी घसरून 21,933 अंकांच्या पातळीवर काम करत आहे. बँक ऑफ जपाननं निगेटिव्ह रेट पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते. 

ओएनजीसी, बजाज फायनान्स, सन फार्मा, अदानी एंटरप्रायझेस आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर नुकसान झालेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये टीसीएस, विप्रो, कोल इंडिया, टाटा स्टील, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होता. 

मंगळवारी शेअर बाजाराच्या व्यवहाराच्या सुरुवातीला अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, फेडरल बँक आणि एसबीआय कार्डचे शेअर तेजीत होते, तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयआरसीटीसी आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

मंगळवारी प्री ओपनिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 283 अंकांच्या घसरणीसह 72465 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 113 अंकांनी घसरून 21942 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता. शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. तर आशियाई शेअर बाजारात मंगळवारी संमिश्र कल होता.

टॅग्स :शेअर बाजार