मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 204 अंकांच्या वाढीसह 66,174.20 वर बंद झाला, तर निफ्टी 95 अंकांच्या वाढीसह 19,889.70 वर बंद झाला. बाजार सुरू झाल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली होती.
मंगळवारी निफ्टीनं कामकाजाच्या अखेरच्या सत्रात अर्ध्या तासात जबरदस्त वाढ नोंदवली आणि 19900 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. ऑईल अँड गॅस निर्देशांक 2.5 टक्के आणि पॉवर निर्देशांक 3 टक्क्यांनी वधारले. तर मेटल, ऑटो आणि पीएसयू बँक, आयटी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
या शेअर्समध्ये वाढ / घसरण
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बीपीसीएल आणि कोल इंडिया या शेअर्समध्ये आज निफ्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाढ दिसून आली. तर सिप्ला, आयटीसी, एचयूएल, सन फार्मा आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
अदानी समूहाचे शेअर्स वधारले
अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, एनडीटीव्ही आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 10 ते 17 टक्क्यांनी वाढ झाली. अदानी पॉवरच्या शेअर्सनं हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर झालेला तोटा तर भरून काढलाच पण 17 टक्क्यांच्या वाढीसह 464.30 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. या वर्षी या शेअरनं आतापर्यंत गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा दिला आहे.
सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला, निफ्टीतही वाढ; अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तुफान तेजी
मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:14 PM2023-11-28T16:14:58+5:302023-11-28T16:15:09+5:30