Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Open: सेन्सेक्स ३६२ अंकांनी वधारला, निफ्टी १९८०० पार; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

Stock Market Open: सेन्सेक्स ३६२ अंकांनी वधारला, निफ्टी १९८०० पार; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजार वाढीसह खुला झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:51 AM2023-10-11T09:51:50+5:302023-10-11T09:52:06+5:30

बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजार वाढीसह खुला झाला.

Sensex gains 362 points Nifty crosses 18000 Adani Group shares rise share market update | Stock Market Open: सेन्सेक्स ३६२ अंकांनी वधारला, निफ्टी १९८०० पार; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

Stock Market Open: सेन्सेक्स ३६२ अंकांनी वधारला, निफ्टी १९८०० पार; अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

Stock Market Updates: मंगळवारी वाढीसह शेअर बाजार बंद झाला होता. त्यानंतर बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजार वाढीसह खुला झाला. सेन्सेक्स ३६२अंकांच्या वाढीसह ६६,४४१ अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह १९८०० अंकांवर व्यवहार करत होता.

प्री ओपनिंगमध्येही शेअर बाजारात वाढ दिसून आली होती. सेन्सेक्स २५७.१२ अंक म्हणजेच ०.३९ अंकांच्या वाढीसह ६६,३२५.४२ अंकांच्या स्तरावर व्यवहार करत होता. तर निफ्टी ९५.८५ अंक म्हणजेच ०.४९ अंकांच्या वाढीसह १९७८५ च्या स्तरावर व्यवहार करत होता.

बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमजीसी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समुहाच्या सर्व लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सर्वाधिक २.४५ टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत होती. तर अदानी पॉवरच्याही शेअरमध्ये तेजी दिसून आली. अदानी टोटल आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्येही १.८ टक्क्यांची तेजी दिसून आली. अदानी विल्मर, एसीसी लिमिटेड, अंबुजा सिमेंट, अदानी एन्टरप्राईजेज, अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

Web Title: Sensex gains 362 points Nifty crosses 18000 Adani Group shares rise share market update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.