Join us  

२०२३ च्या अखेरच्या आठवड्यात Sensex मध्ये ११३३ अंकांची उसळी, पाहा कोणत्या कंपनीला सर्वाधिक लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 2:12 PM

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप एकत्रितपणे 1,29,899.22 कोटी रुपयांनी वाढलं.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप एकत्रितपणे 1,29,899.22 कोटी रुपयांनी वाढलं. वर्षाच्या कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,133.3 अंकांनी किंवा 1.59 टक्क्यांनी वाढला. 28 डिसेंबर रोजी सेन्सेक्सने 72,484.34 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली. नाताळनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद होते.HDFC Bank चं मार्केट कॅप 29828 कोटींनी वाढलं.समीक्षाधीन आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) यांचं मार्केट कॅप वाढले. त्याच वेळी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये घट झाली. आठवडाभरात एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 29,828.84 कोटी रुपयांनी वाढून 12,97,972.04 कोटी रुपयांवर पोहोचलं. एलआयसीचं बाजारमूल्य 25,426.49 कोटी रुपयांनी वाढून 5,27,062.06 कोटी रुपये झाले.

HUL चं मार्केट कॅप वाढलंभारती एअरटेलचं मार्केट कॅप 24,510.96 कोटी रुपयांनी वाढून 5,80,645.54 कोटी रुपये आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचं मार्केट कॅप 20,735.14 कोटी रुपयांनी वाढून 6,25,778.39 कोटी रुपयांवर पोहोचलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप 13,633.07 कोटी रुपयांनी वाढून 17,48,827.92 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. ITC चं मूल्यांकन 9,164.74 कोटी रुपयांनी वाढून 5,76,809.77 कोटी रुपयांवर पोहोचलं.

कोणत्या आहेत टॉप १० कंपन्याटॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, आयटीसी, एसबीआय आणि एलआयसी यांना या यादीत स्थान मिळालं आहे.

टॅग्स :शेअर बाजार