Lokmat Money >शेअर बाजार > चढ-उतारादरम्यान सेन्सेक्स-निफ्टीमध्ये फ्लॅट क्लोजिंग; डिफेन्स, बँकिंग आणि कन्झुमर स्टॉक्समध्ये जोरदार तेजी

चढ-उतारादरम्यान सेन्सेक्स-निफ्टीमध्ये फ्लॅट क्लोजिंग; डिफेन्स, बँकिंग आणि कन्झुमर स्टॉक्समध्ये जोरदार तेजी

Stock Market Closing On 3 September 2024:  भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज कामकाजाच्या अखेरिस फ्लॅट बंद झाले. मात्र, आजच्या सत्रात बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:13 PM2024-09-03T16:13:07+5:302024-09-03T16:13:17+5:30

Stock Market Closing On 3 September 2024:  भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज कामकाजाच्या अखेरिस फ्लॅट बंद झाले. मात्र, आजच्या सत्रात बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. 

Sensex Nifty closes flat amid volatility Strong gains in defense banking and consumer stocks | चढ-उतारादरम्यान सेन्सेक्स-निफ्टीमध्ये फ्लॅट क्लोजिंग; डिफेन्स, बँकिंग आणि कन्झुमर स्टॉक्समध्ये जोरदार तेजी

चढ-उतारादरम्यान सेन्सेक्स-निफ्टीमध्ये फ्लॅट क्लोजिंग; डिफेन्स, बँकिंग आणि कन्झुमर स्टॉक्समध्ये जोरदार तेजी

Stock Market Closing On 3 September 2024:  भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज कामकाजाच्या अखेरिस फ्लॅट बंद झाले. मात्र, आजच्या सत्रात बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. 

आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही चमक दिसून आल्यानं बाजाराचं मार्केट कॅप आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स ८२,५५५ आणि निफ्टी २५,२७९ अंकांवर बंद झाला.

'या' शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १२ शेअर्स वधारले आणि १८ घसरले. तर निफ्टीचे ५० पैकी २१ शेअर्स वधारले आणि २९ घसरले. आयसीआयसीआय बँक १.३७ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.३० टक्के, टायटन ०.८५ टक्के, नेस्ले ०.७५ टक्के, एचडीएफसी बँक ०.७२ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.२५ टक्के, एसबीआय ०.२३ टक्के, एल अँड टी ०.२३ टक्के, कोटक बँक ०.२१ टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तर घसरलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स १.२९ टक्के, इन्फोसिस १.२८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.९९ टक्के, एचसीएल टेक ०.९५ टक्के, भारती एअरटेल ०.८२ टक्के यांचा समावेश होता.

मार्केट कॅप ऑल टाईम हायवर

भारतीय शेअर बाजारातील तेजी, विशेषत: बँकिंग, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे मार्केट कॅपनं विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६५.४८ लाख कोटी रुपयांवर बंद झालं. मागील सत्रात बाजाराचं मार्केट कॅप ४६४.८५ लाख कोटी रुपये होतं. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये ६३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title: Sensex Nifty closes flat amid volatility Strong gains in defense banking and consumer stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.