Stock Market Closing On 2 September 2024: शेअर बाजारासाठी सप्टेंबर सुरुवात अतिशय दमदार झाली. एफएमसीजी, आयटी आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली, तर मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. आजच्या व्यवहाराअखेर बीएसई सेन्सेक्स १९४ अंकांनी वधारून ८२,५६० वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंकांनी वधारून २५,२७९ अंकांवर बंद झाला.
'या' शेअर्समध्ये तेजी / घसरण
आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी २१ शेअर्स वधारले तर ९ घसरले. तर निफ्टीचे ५० पैकी २७ शेअर्स वधारले आणि २३ घसरले. बजाज फिनसर्व्ह ३.२६ टक्के, बजाज फायनान्स २.७७ टक्के, एचसीएल टेक २.७२ टक्के, इंडसइंड बँक १.५५ टक्के, आयटीसी १.५२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.१० टक्के, अॅक्सिस बँक १.०६ टक्के, इन्फोसिस ०.८९ टक्के, एशियन पेंट्स ०.८४ टक्के, अदानी पोर्ट्स ०.७९ टक्के, एसबीआय ०.७८ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे टाटा मोटर्स १.५१ टक्के, एनटीपीसी १.४५ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.१८ टक्के, भारती एअरटेल ०.९० टक्के, एल अँड टी ०.७३ टक्के, पॉवर ग्रिड ०.५६ टक्के, टीसीएस ०.५० टक्क्यांनी घसरुन बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
आजच्या व्यवहारादरम्यान गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तेजी दिसून आली आहे. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६४.८४ लाख कोटी रुपयांवर बंद झालं, जे मागील सत्रात ४६४.३९ लाख कोटी रुपयांवर बंद झालं. आजच्या व्यवहाराअंती गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४५००० कोटी रुपयांची वाढ झाली.