Join us  

सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:07 PM

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 165 अंकांच्या वाढीसह 73668 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 165 अंकांच्या वाढीसह 73668 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी तीन अंकांच्या वाढीसह 22335 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेस, ग्रासिम इंडस्ट्रीज, सिप्ला आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स टॉप लूझर श्रेणीत होते, तर टॉप गेनर्सच्या यादीत एचडीएफसी बँक, टीसीएस, एलटीआय माइंड ट्री आणि मारुती सुझुकीच्या शेअर्सचा समावेश होता. 

निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि निफ्टी आयटीने वाढ नोंदवली. 

मारुती सुझुकी, इन्फोसिस, आयशर मोटर्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्सचाही शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. तर एसबीआय, बजाज ऑटो आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्सही टॉप लूझर्सच्या यादीत समाविष्ट होते. शेअर बाजाराच्या दैनंदिन कामकाजात बरेच चढ-उतार दिसून आले. मंगळवारी ब्रिटिश शेअर बाजारात तेजी दिसून आली. कंपन्यांच्या कमाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर युरोपीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार