Stock Market Closing On 16 September 2024 : जगभरात मंदिचे सावट असताना भारतीय शेअर बाजार दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर्सने नाराज केलं नाही. शेअर बाजाराच्या प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही बाजारांसाठी आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक ठरला आहे. प्राथमिक बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओची बंपर लिस्टिंग होती. त्यामुळे दुय्यम बाजारात BSE सेन्सेक्स आणि MSE निफ्टी हे दोन्ही ऐतिहासिक उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरले आहेत.
आजच्या व्यवहारात बँकिंग आणि एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बाजार बंद झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स ९८ अंकांच्या उसळीसह ८२,९८९ अंकांवर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७ अंकांच्या उसळीसह २५,३८४ अंकांवर बंद झाला. यामध्ये कोणते शेअर्स चढले आणि कोणते कोसळले याचा आढावा.
मार्केट कॅप विक्रमी पातळीवर
भारतीय शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे बाजार भांडवलाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर लिस्टिंग शेअर्सचे मार्केट कॅप ४७०.४९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात ४६८.७१ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात बाजाराच्या भांडवलात १.७८ लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.
कोणत्या शेअर्सने केलं कंगाल?
सेन्सेक्समधील ३० शैअर्सपैकी १५ स्टॉक्स वाढीसह आणि १५ शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २५ वाढीसह आणि २५ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये एनटीपीसी २.४४ टक्के, एलअँडटी १.३५ टक्के, ॲक्सिस बँक ०.९७ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.९४ टक्के, नेस्ले ०.७२ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स 3.36 टक्के, एचयूएल 2.30 टक्के पडून बंद झाले.