Join us  

मोठ्या चढ-उतारानंतर Sensex-Nifty घसरणीसह बंद; IT शेअर्स घसरले, अल्ट्राटेकमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 4:02 PM

Share Market Closing Bell : चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरून ७६,४९० अंकांवर बंद झाला.

Share Market Closing Bell : चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरून ७६,४९० अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक ३१ अंकांनी घसरून २३,२५९ अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजातील कमकुवतपणामुळे निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर सर्वच आयटी कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. 

कामकाजादरम्यान शेअर बाजारात चढ-उतार 

दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर कामकाजाच्या अखेरिस शेअर बाजार रेड झोनमध्ये बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजात दिवसभर चढ-उतार होत होते, बीएसई सेन्सेक्स कधी रेड झोनमध्ये तर कधी ग्रीन झोनमध्ये काम करत होते. बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले, तर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. 

कोण टॉप गेनर / लूझर 

सोमवारी अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी लाइफचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा, बजाज फायनान्स, एलटी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले. अल्ट्राटेक सिमेंट, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, टाटा स्टील, बजाज ऑटो, डिव्हिस लॅब आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्सनं शेअर बाजारातील अस्थिर कामकाजादरम्यानही ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. 

मल्टिबॅगर शेअर्सची स्थिती 

शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारादरम्यान टीटागड रेल, टॅक्स मेको रेल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, एनटीपीसी, राइट्स लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल आणि आयआरसीटीसीचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर बीईएल, कंटेनर कॉर्पोरेशन, रेल विकास निगम, कोल इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आयआरएफसी, कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक, एनएमडीसी, बीईएमएल, गार्डन रीच शिपबिल्डर आणि गेल इंडिया लिमिटेडचे शेअर्स घसरले. 

एशियन पेंट्स आणि लार्सन हे समभाग किरकोळ वाढीसह बंद झाले, तर आयसीआयसीआय बँक, अशोक लेलँड, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. गौतम अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले. तर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार