Join us  

सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टीचा २२२९७ च्या लाईफटाईम उच्चांकाला स्पर्श, BPCL आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 4:00 PM

शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीसह बंद झालं.

Closing Bell Today : शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी घसरणीसह बंद झालं. शेअर बाजाराच्या कामकाजात दिवसभर चढ-उतार दिसून आले. बीएसई सेन्सेक्स 15 अंकांनी घसरून 73142 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 5 अंकांनी घसरून 22212 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान निफ्टीनं 22297 चा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला होता. निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकाने वाढ नोंदवली गेली. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह बंद झाले.निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकातही घसरण नोंदवली गेली. तर निफ्टी फार्मा किंचित वाढीसह बंद झाला. दरम्यान, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, डॉ. रेड्डीज, टायटन, एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंड ट्री यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर बीपीसीएल, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

एसबीआय लाईफ, डॉ. रेड्डीज, महिंद्रा, सिप्ला, रिलायन्स, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान 11 टक्क्यांनी वाढ झाली आणि तो 335 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. 

पेटीएमच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली तर स्टोव्ह क्राफ्ट, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, टाटा टेक, युनि पार्ट्स आणि हिंदुस्तान झिंक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.  

एचडीएफसी बँक, पटेल इंजिनिअरिंग, एनएमडीसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, ग्लोबस स्पिरिट, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, उर्जा ग्लोबल, ॲक्सिस बँक, यूपीएल, एक्साइड इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, ओएनजीसी, ओम इन्फ्रा, देवयानी इंटरनॅशनल, ब्रँड कॉन्सेप्ट, पंजाब आणि सिंध बँक आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार