Join us

सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ तेजीसह बंद; Small Cap शेअर्समध्ये जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:05 PM

Stock Market Closing On 27 August 2024: भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्मॉल कॅप शेअर्सचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक आतापर्यंतचा उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला आहे.

Stock Market Closing On 27 August 2024: भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्मॉल कॅप शेअर्सचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक आतापर्यंतचा उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांक आतापर्यंतचा उच्चांक गाठण्यापासून थोडाच दूर राहिला. आज बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स १४ अंकांनी वधारून ८१,७११ वर तर निफ्टी ७.१५ अंकांनी वधारून २५,०१८ अंकांवर बंद झाला. निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी २५,००० च्या वर बंद झाला.

या शेअर्समध्ये घसरण / तेजी

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी ११ शेअर्स वधारले तर १९ शेअर्स घसरले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २१ शेअर्स वधारले तर २९ शेअर्स घसरले. बजाज फिनसर्व्ह २.३७ टक्के, मारुती सुझुकी १.८७ टक्के, एल अँड टी १.६१ टक्के, बजाज फायनान्स १.३७ टक्के, इन्फोसिस १.११ टक्के, सन फार्मा १.०२ टक्के, अॅक्सिस बँक ०.७४ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.६३ टक्के, भारती एअरटेल ०.५१ टक्के, एशियन पेंट्स ०.१५ टक्क्यांनी वधारून बंद झाले. एचयूएल २.०१ टक्क्यांनी तर टायटन १.८९ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

मार्केट कॅप उच्चांकी पातळीवर

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६३.०८ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर बंद झालं, जे मागील सत्रात ४६२.२९ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७९००० कोटी रुपयांची वाढ झाली.

टॅग्स :शेअर बाजार