Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

सोमवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बीएसई सेन्सेक्स 523 अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:07 PM2024-02-12T16:07:07+5:302024-02-12T16:07:18+5:30

सोमवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बीएसई सेन्सेक्स 523 अंकांवर बंद झाला.

Sensex Nifty closes with big fall IT Pharma Shares Gain Banking Shares Fall huge loss | सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Closing Bell: सोमवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बीएसई सेन्सेक्स 523 अंकांनी घसरला आणि 71072 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166 अंकांनी घसरून 21616 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँकसह निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेससह निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण दिसून आली. निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा निर्देशांक वाढीसह बंद झाले.
 

कामकाजाच्या अखेरिस डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल, डिवीज लॅब, विप्रो, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्री यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, टाटा स्टील, एनटीपीसी आणि एसबीआयचे बीपीसीएल शेअर्स घसरणीसह बंद झाले.
 

सोमवारी शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान ओरिएंट इलेक्ट्रिक, शारदा क्रॉप केम, दीपक फर्टिलायझर्स, पॉलीप्लेक्स कॉर्प आणि विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण
 

कामकाजादरम्यान, गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी दोन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवली गेली तर आठ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सोमवारी महिंद्रा अँड महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि यूपीएलच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवली गेली, तर एशियन पेंट्स, जिओ फायनान्शियल, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान झिंक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एक्साइड इंडस्ट्रीज, ओएनजीसी, ओम इन्फ्रा, एनएमडीसी, उर्जा ग्लोबल, ब्रँड कॉन्सेप्ट, पटेल इंजिनीअरिंग आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Web Title: Sensex Nifty closes with big fall IT Pharma Shares Gain Banking Shares Fall huge loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.