Join us  

RBI मॉनिटरी पॉलिसीपूर्वी Sensex-Nifty घसरले; गुंतवणूकदारांनी गमावले ₹६१००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 9:48 AM

Sensex-Nifty slips ahead RBI Rate Announcement: रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (एमपीसी) आज रेपो दराबाबत निर्णय देणार आहे. या घोषणेपूर्वी जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

Sensex-Nifty slips ahead RBI Rate Announcement: रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (एमपीसी) आज रेपो दराबाबत निर्णय देणार आहे. या घोषणेपूर्वी जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी घसरण झाली. बँका, फार्मा आणि एफएमसीजी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक लाल होते. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज ६१.१ हजार कोटी रुपयांनी घटले आहे. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६१.१ हजार कोटी रुपयांची घसरण झाली.

इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या २०७.९३ अंकांनी म्हणजेच ०.२६ टक्क्यांनी घसरून ७९,२६०.०८ वर आणि निफ्टी ५० ४९.९० अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून २४,२४७.६० वर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स ७९,४६८.०१ वर तर निफ्टी २४,२९७.५० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६१.१ हजार कोटींची घट

एका दिवसापूर्वी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी बीएसईवरील सर्व लिस्टेड शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,४८,५७,३०६.५५ कोटी रुपये होतं. आज ८ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४७,९६,१९४.२३ कोटी रुपये होतं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ६१,११२.३२ कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे ८ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी ८ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. आयटीसी, टाटा मोटर्स आणि टायटनमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील आणि एल अँड टी मध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. याशिवाय एचडीएफसी, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक यांच्याही शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार