Lokmat Money >शेअर बाजार > Hindernburg च्या झटक्यानं Sensex-Nifty घसरले; गुंतवणूकदारांचे ₹२.२६ लाख कोटी बुडाले; अदानींचे शेअर्स घसरले

Hindernburg च्या झटक्यानं Sensex-Nifty घसरले; गुंतवणूकदारांचे ₹२.२६ लाख कोटी बुडाले; अदानींचे शेअर्स घसरले

Sensex-Nifty Slips: सेबी आणि अदानी समूहानं हिंडरबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी त्याचा धक्का शेअर बाजारात दिसून येत आहे. बहुतांश जागतिक बाजारांकडून मजबूत संकेत असूनही देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 09:44 AM2024-08-12T09:44:35+5:302024-08-12T09:44:54+5:30

Sensex-Nifty Slips: सेबी आणि अदानी समूहानं हिंडरबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी त्याचा धक्का शेअर बाजारात दिसून येत आहे. बहुतांश जागतिक बाजारांकडून मजबूत संकेत असूनही देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले.

Sensex Nifty falls on Hindenburg report Investors lost rs 2 26 lakh crore Adani shares fell | Hindernburg च्या झटक्यानं Sensex-Nifty घसरले; गुंतवणूकदारांचे ₹२.२६ लाख कोटी बुडाले; अदानींचे शेअर्स घसरले

Hindernburg च्या झटक्यानं Sensex-Nifty घसरले; गुंतवणूकदारांचे ₹२.२६ लाख कोटी बुडाले; अदानींचे शेअर्स घसरले

Sensex-Nifty Slips: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गनं बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अदानी समूहाशी संगनमत केल्याचा आरोप केला होता. सेबी आणि अदानी समूहानं हिंडरबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी त्याचा धक्का शेअर बाजारात दिसून येत आहे. बहुतांश जागतिक बाजारांकडून मजबूत संकेत असूनही देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये विक्रीचा प्रचंड दबाव आहे. सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवरमध्ये झाली आहे. कन्झ्युमर ड्युरेबल्स वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा कल आहे.

एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप २.२६ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.२६ लाख कोटी रुपयांची घट झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स १६३.३१ अंकांच्या घसरणीसह ७९,५४२.६० वर आणि निफ्टी ५० ५७.५५ अंकांनी म्हणजेच ०.२४ टक्क्यांनी घसरून २४,३०९.९५ वर आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ७९,७०५.९१ वर तर निफ्टी २४,३६७.५० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.२६ लाख कोटींची घट

एक दिवस आधी म्हणजे ९ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५०,२१,८१६.११ कोटी रुपये होतं. १२ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच तो ४,४७,९५,२४९.०० कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २,२६,५६७.११ कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेन्सेक्सचे ६ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी ६ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. सन फार्मा, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. दुसरीकडे अदानी पोर्ट्स, पॉवरग्रिड आणि एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

Web Title: Sensex Nifty falls on Hindenburg report Investors lost rs 2 26 lakh crore Adani shares fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.