गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली होती. परंतु त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स ३८ अंकांच्या घसरणीसह ७७२९६ अंकांवर तर निफ्टी ३९ अंकांच्या घसरणीसह २३४६२ अंकांवर कामकाज करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक रेड झोनमध्ये कार्यरत होते. तर निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात पीएनबी हाऊसिंगच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये तेजी होती.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ज्युबिलंट इंग्रेव्हिया, त्रिवेणी इंजिनीअरिंग आणि शोभा या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर वेबको, केईआय इंडस्ट्रीज, माझगाव डॉक शिपबिल्डर, आलोक इंडस्ट्रीज आणि ईआयडी पॅरी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
प्री ओपन मार्केटची स्थिती
गुरुवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ३५६ अंकांच्या वाढीसह ७७६९४ अंकांच्या पातळीवर उघडला, तर निफ्टी २० अंकांच्या जोरावर २३५३६ अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणण्यानुसार अल्पावधीत शेअर बाजाराची धारणा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेअर बाजाराचं कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकतं असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते.