Closing Bell Today - बुधवारी शेअर बाजारात बंपर वाढ नोंदवण्यात आली आणि सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी दिसून आली. बुधवारी शेअर बाजार 409 अंकांच्या वाढीसह 74085 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांच्या वाढीसह 22474 च्या पातळीवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स प्रथमच 74000 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने 22474 अंकांच्या पातळीवर नवीन आजवरचा उच्चांक गाठला.
बजाज ऑटो, कोटक बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे टॉप गेनर्सच्या यादीत होते. तर अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ओएनजीसी, मारुती सुझुकी, बीपीसीएल आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
बुधवारच्या व्यवहारादरम्यान बजाज ऑटो, सन फार्मा, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले, तर आयआयएफएल फायनान्स, सुमितोमो केमिकल्स, एसबीआय कार्ड, ओरिएंट रिफ्रॅक्टरीज, केआरबीएल, झी एंटरटेनमेंट आणि अतुल लिमिटेडच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.
शेअर बाजारातील तेजीचे मुख्य कारण म्हणजे खासगी बँकांच्या शेअर्समध्ये झालेली बंपर वाढ. एका दिवसाच्या घसरणीनंतर बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा जोर पकडला. चार दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली.