Closing Bell Today: मंगळवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स 220 अंकांनी घसरून 75170 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 44 अंकांनी घसरून 22888 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजात दिवसभर चढ-उतार होत असतात. सेन्सेक्सनं कधी ग्रीन झोनमध्ये तर कधी रेड झोनमध्ये व्यवहार केला.
रियल्टी आणि पीएसयू बँकांचा समावेश टॉप लूजर्सच्या यादीत झाला. मंगळवारी शेअर बाजारातील चढउतारात निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक किरकोळ तेजी दिसून आली, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. ग्लेनमार्क फार्मा, कोरोमंडल इंटरनॅशनल, डिव्हिस लॅब आणि एक्साइड इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली.
कोण टॉप गेनर्स/लूझर्स?
मंगळवारी सर्वाधिक वधारलेल्या शेअर्समध्ये डिव्हिस लॅब्स, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, हीरो मोटोकॉर्प, ग्रासिम इंडस्ट्रीज, डॉक्टर रेड्डीज आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या समभागांचा समावेश आहे, तर सर्वाधिक घसरलेल्या कंपन्यांच्या यादीत अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, कोल इंडिया, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि ओएनजीसीच्या शेअर्सचा समावेश आहे.
डॉम्स इंडस्ट्रीज, एक्साइड इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क फार्मा, डिव्हिस लॅब, सुमितोमो केमिकल, विजया डायग्नोस्टिक आणि कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली.