Join us  

सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; अपोलो हॉस्पिटलच्या शेअरमध्ये तेजी, एल अँड टी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 9:56 AM

निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते.

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी घसरणीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यापारात, बीएसई सेन्सेक्स 45 अंकांनी घसरला होता आणि 72745 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 14 अंकांनी घसरला होता आणि 22107 अंकांच्या पातळीवर उघडला. परंतु त्यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली आणि सेन्सक्स 50 अंकांच्या तेजीसह 72,840.14 वर पोहोचला. तर निफ्टी 22 अंकांच्या तेजीसह 22,143.80 गेला.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फार्मा निर्देशांकांनी किंचित वाढ नोंदवली तर निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. 

सिमेंट, टीसीएस, एचसीएल टेक, ग्रासिम इंडस्ट्रीज, इन्फोसिस, सिप्ला आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, ओएनजीसी, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, मारुती सुझुकी, एनटीपीसी, महिंद्रा आणि डॉ. रेड्डीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजारात पीएनसी इन्फ्रा, डेटा पॅटर्न, एचडीएफसी एएमसी, आयसीआयसीआय लोम्बार्ड, सोना बीएलडब्ल्यू, बिर्ला कॉर्प यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. तर व्हर्लपूल इंडियाच्या शेअर्सनं 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. 

मंगळवारी, प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 66 अंकांच्या घसरणीसह 72723 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 32 अंकांनी घसरून 22090 अंकांच्या पातळीवर कार्यरत होता.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार