Join us  

Sensex-Nifty ची फ्लॅट ओपनिंग; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹८० हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 9:40 AM

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत.

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र, कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजाराला आधार मिळाला असून दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये जात असल्याचं दिसून येतंय. निफ्टी क्षेत्रातील बहुतांश निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. आयटी आणि ऑटो शेअर्सकडून बेस्ट सपोर्ट मिळत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे.

एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ८० हजार कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८० हजार कोटी रुपयांची वाढ झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ८१,७२३.४६ वर आणि निफ्टी ५० २५,०१७.३५ वर ट्रेड करत होता. यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्स ८१,७११.७६ वर आणि निफ्टी २५,०१७.७५ वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८० हजार कोटींची वाढ

एक दिवसापूर्वी म्हणजे २७ ऑगस्ट रोजी बीएसईवर लिस्डेट सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६३,१४,९२७.७७ कोटी रुपये होतं. आज २८ ऑगस्ट रोजी बाजार उघडताच ते ४,६३,९५,१३८.९६ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ८०,२११.१९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे १७ शेअर ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १७ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि इन्फोसिसमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे अॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि अल्ट्राटेकचे शेअर्स सर्वाधिक घसरले. बजाज फायनान्स, सनफार्मा, एल अँड टी, एचसीएल टेक, रिलायन्स, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, टायटन, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार