Join us  

Stock Market Today : जागतिक दबावादरम्यान Sensex-Niftyची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; गुंतवणूकदारांनी कमावले ₹३५.४ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 9:42 AM

Stock Market Today : जागतिक बाजारातून विक्रीचे संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही मंदीचं वातावरण आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी जवळपास फ्लॅट ओपन झाले.

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातून विक्रीचे संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारातही मंदीचं वातावरण आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी जवळपास फ्लॅट ओपन झाले. मेटल आणि ऑटो वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. निफ्टीच्या मेटल आणि ऑटो निर्देशांकातही किंचित घसरण झाली. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. दरम्यान, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ३५.४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३५.४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ६१.३० अंकांनी म्हणजेच ०.०८ टक्क्यांनी वाढून ८१,७५९.४१ वर आणि निफ्टी ५० ८३.०५ अंकांनी म्हणजे ०.०५ टक्क्यांनी घसरून २५,०२१.९० वर बंद झाला आहे. यापूर्वी सोमवारी सेन्सेक्स ८१,६९८.११ आणि निफ्टी २५,०१०.६० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३५.४ हजार कोटींची वाढ

एक दिवसापूर्वी म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,६२,२९,९५९.१७ कोटी रुपये होतं. आज २७ ऑगस्ट रोजी बाजार उघडताच ते ४,६२,६५,३५६.५७ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३५,३९७.४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे १३ शेअर्स ग्रीन झोनमध्येसेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि एल अँड टीमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर एशियन पेंट, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक घसरले. एचसीएल टेक, सनफार्मा, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार