Join us  

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; कोल इंडिया वधारला, हिंदाल्कोमध्ये १० टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:39 AM

शेअर बाजारातील कामकाजाला मंगळवारी सकारात्मक सुरुवात झाली.

शेअर बाजारातील कामकाजाला मंगळवारी सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई  सेन्सेक्स 192 अंकांच्या वाढीसह 71,295 अंकांच्या पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 48 अंकांच्या वाढीसह 21664 अंकांच्या पातळीवर उघडला आहे. सुमारे दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजारात उत्तम कामगिरी दिसून येत होती. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीवर काम करत होता तर निफ्टी 21675 अंकांच्या वर काम करत होता. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात घसरण दिसून आली, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर्समध्ये घसरण तर डिवीज लॅब, विप्रो, एचसीएल टेकचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते. 

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी असलेल्या शेअर्समध्ये कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर, आयशर मोटर्स, बीपीसीएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश होता, तर हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, एसबीआय लाइफ आणि एलटीआय माइंड ट्री या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार