Join us  

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; माझगांव डॉकचे शेअर्स वधारले, FACT च्या शेअर्समध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 9:45 AM

बीएसई सेन्सेक्स २१४ अंकांच्या वाढीसह ७९,५०९ अंकांवर तर निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह २४०८६ अंकांवर उघडला.

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स २१४ अंकांच्या वाढीसह ७९,५०९ अंकांवर तर निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह २४०८६ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व सेक्टोरल इंडेक्स ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते, तर निफ्टी ऑटो निर्देशांक किंचित घसरण नोंदवत होता. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ३६० वन टीम, डीएसएल, इंडस टॉवर्स, कल्याण ज्वेलर्स, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, स्टार हेल्थ, कृष्णा इन्स्टिट्यूट या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर सुरुवातीच्या कामकाजादरम्यान दीपक फर्टिलायझर्स, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फॅक्ट, सनटेक रियल्टी आणि फिलिप्स कार्बन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

प्री ओपनमध्ये मार्केटची स्थिती

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स १४६ अंकांनी वधारून ७९,३८९ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ३५६ अंकांनी घसरून २३,६८८ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती काय?

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत बोलायचं झालं तर शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात टॅक्स मॅन्को रेल, ओएनजीसी, आयओएन एक्स्चेंज, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, अशोक लेलँड, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर लार्सन, एचसीएल टेक, विप्रो, बिर्ला कॉर्पोरेशन आणि जेके पेपर चे समभाग घसरणीवर व्यवहार करत होते.

टॅग्स :शेअर बाजार