Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला

Share Market Opening Bell : चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात किरकोळ तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ७६७८९ अंकांवर तर निफ्टी ८१ अंकांनी वधारून २३,३७१ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:47 AM2024-06-10T09:47:19+5:302024-06-10T09:47:27+5:30

Share Market Opening Bell : चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात किरकोळ तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ७६७८९ अंकांवर तर निफ्टी ८१ अंकांनी वधारून २३,३७१ अंकांवर उघडला.

Sensex Nifty opens on a bullish note Power Grid up in Opening Bell NMDC falls details | सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; Opening Bell मध्ये Power Grid मध्ये तेजी, एनएमडीसी घसरला

Share Market Opening Bell : चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात किरकोळ तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ७६७८९ अंकांवर तर निफ्टी ८१ अंकांनी वधारून २३,३७१ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत कार्यरत होते. 
 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी, ओएनजीसी आणि बीपीसीएलच्या शेअर्सचा समावेश होता, तर टॉप लूजर्समध्ये हिंदाल्को, डॉक्टर रेड्डीज, महिंद्रा, इन्फोसिस, एलटी, ब्रिटानिया आणि टायटनच्या शेअर्सचा समावेश होता.
 

मल्टीबॅगर स्टॉक स्थिती
 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, अशोक लेलँड, लार्सन या कंपन्यांचे शेअर्स वधारत होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयआरएफसी, टॅक्स मेको रेल, राइट्स लिमिटेड, कोल इंडिया, इरकॉन इंटरनॅशनल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, टिटागड रेल, रेल विकास निगम, एनटीपीसी, भेल आणि कंटेनर कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, तर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात एनएमडीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण झाली
 

गिफ्ट निफ्टी ६० अंकांनी घसरला
 

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निफ्टी ६० अंकांच्या घसरणीवर कामकाज करत होता. यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकतं, असे संकेत मिळत होते. निफ्टीमध्ये निफ्टी फ्युचर्स ६२ अंकांनी घसरून २३,२६७ अंकांवर व्यवहार करत होता. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. आशियाई शेअर बाजारात सोमवारी सुरुवातीच्या कामात कमकुवतपणा दिसून आला. केंद्रात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पायाभूत सुविधा क्षेत्रावरील लक्ष वाढू शकतं, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करता येऊ शकते, असं शेअर बाजारातील जाणकारांचं म्हणणं आहे.
 

प्री ओपन मार्केटची स्थिती
 

सोमवारी प्री-ओपन मार्केटमध्ये निफ्टी ७ अंकांच्या घसरणीसह २३२८३ अंकांवर उघडला, तर सेन्सेक्स ५९२ अंकांच्या वाढीसह ७७,२८५ अंकांवर व्यवहार करत होता. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनिश्चितता असतानाही शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद करण्यात यशस्वी ठरला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक निर्देशांक चांगले संकेत देत असल्यानं बाजारात तेजी कायम राहील, असा अंदाज शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sensex Nifty opens on a bullish note Power Grid up in Opening Bell NMDC falls details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.