Stock Market News: अमेरिकन आणि युरोपियन बाजारांतील मजबूत कल आणि आशियाई बाजारांतील संमिश्र कलांदरम्यान देशांतर्गत बाजारातही मोठी तेजी दिसून येत आहे. सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी आली. रियल्टी शेअर्समुळे बाजारावर प्रचंड दबाव येत असून त्याचा निफ्टी निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. याशिवाय निफ्टी मेटलमध्येही अर्धा टक्क्यांहून अधिक तर निफ्टी एफएमसीजीमध्ये किंचित घसरण दिसून येत आहे. याशिवाय निफ्टीचे उर्वरित निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. दरम्यान, आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येतेय.
एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप १.९४ लाख कोटी रुपयांनी वाढलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.९४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स कामकाजाच्या सुरुवातीला १८९.७९ अंकांनी म्हणजेच ०.२४ टक्क्यांनी वधारून ८०,७०९.१३ वर आणि निफ्टी ५० हा ६१.२५ अंकांनी वाढून २४,५६३.४० वर व्यवहार करत होता.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
एक दिवसापूर्वी म्हणजेच १२ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५२,३८,५५३.६८ कोटी रुपये होतं. आज १५ जुलै २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५४,३३,३९३.७६ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,९४,८४०.०८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे २२ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २२ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. तर एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. या शिवाय टीसीएस, मारूती सुझुकी, एसबीआय, एल अँड टी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, रिलायन्स, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील्स, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.