Join us  

सेन्सेक्स-निफ्टीची सामान्य नोटवर सुरुवात; सिग्नेचर ग्लोबल वधारला, Zomato मध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 9:50 AM

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७८९८७ अंकांवर उघडला.

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४५ अंकांनी घसरून ७८९८७ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८ अंकांनी घसरून २३९९३ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.

तर बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी मिडकॅप १००, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा निर्देशांकात किंचित वाढ नोंदविण्यात आली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये सीडीएसएल, चोला फायनान्स होल्डिंग्स, मदरसन सुमी आणि पॉलीकॅब इंडियाच्या समभागांचा समावेश होता. तर घसरण झालेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गॉडफ्रे फिलिप्स, एव्हेन्यू सुपरमार्ट, सिएट आणि आयआयएफएल फायनान्सच्या शेअर्सचा समावेश होता.

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर आयओएन एक्स्चेंज, टॅक्स मेको रेल, जेके पेपर, बिर्ला कॉर्पोरेशन, अशोक लेलँड, टीसीएस, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस आणि ओएनजीसीचे शेअर्स वधारले, तर आरपीजी लाइफ सायन्स, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स घसरले.

गार्डन रीच शिपबिल्डर, कोचीन शिपयार्ड, एनएमडीसी लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बीईएमएल, आयआरसीटीसी, रेलटेल, गेल इंडिया आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे शेअर सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात वधारले, तर इरकॉन, राइट्स लिमिटेड, कोल इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत डायनॅमिक्स, रेल विकास निगम, एनएचपीसी, एसजेव्हीएन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, कंटेनर कॉर्पोरेशन, पॉवर ग्रिड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, माझगाव डॉक आणि टिटागड रेल सिस्टीमच्या शेअरमध्ये घसरण नोंदविण्यात आली.

प्री ओपन मार्केटची स्थिती

चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सामान्य नोटवर सुरू होईल, अशी अपेक्षा होती. प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ७८९३३ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ३४ अंकांच्या घसरणीसह २४०१० अंकांवर व्यवहार करत होता. सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरळीत सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून देण्यात आले होते.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक