Lokmat Money >शेअर बाजार > Sensex-Nifty ची तेजीसह सुरुवात, IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी; जीएनएफसी पडला

Sensex-Nifty ची तेजीसह सुरुवात, IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी; जीएनएफसी पडला

शेअर बाजाराच्या कामकाजाला शुक्रवारी तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स १४८ अंकांच्या वाढीसह ७७६२७ अंकांवर तर निफ्टी ४९ अंकांच्या वाढीसह २३६१६ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:39 AM2024-06-21T09:39:06+5:302024-06-21T09:39:20+5:30

शेअर बाजाराच्या कामकाजाला शुक्रवारी तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स १४८ अंकांच्या वाढीसह ७७६२७ अंकांवर तर निफ्टी ४९ अंकांच्या वाढीसह २३६१६ अंकांवर उघडला.

Sensex Nifty opens with a bullish start bumper rally in IT stocks GNFC fell | Sensex-Nifty ची तेजीसह सुरुवात, IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी; जीएनएफसी पडला

Sensex-Nifty ची तेजीसह सुरुवात, IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी; जीएनएफसी पडला

शेअर बाजाराच्या कामकाजाला शुक्रवारी तेजीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स १४८ अंकांच्या वाढीसह ७७६२७ अंकांवर तर निफ्टी ४९ अंकांच्या वाढीसह २३६१६ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी बँक निर्देशांक रेड झोनमध्ये उघडला, तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही घसरण दिसत होती. निफ्टी आयटी निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक वधारला, तर इतर सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीमध्ये सीई इन्फोसिस्टीम्सच्या शेअर्सचा समावेश होता, तर जीएनएफसीच्या शेअरमध्ये घसरण होती.
 

शेअर बाजाराच्या सकाळच्या कामकाजात हॅपिएस्ट माइंड, मॅक्स हेल्थ केअर, फॅक्ट, पर्सिस्टंट सिस्टिम्स, सोनाटा सॉफ्टवेअर, हिमाद्री स्पेशालिटी आणि सीई इन्फो सिस्टीम्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर पीएनबी हाऊसिंग, सनोफी इंडिया, आलोक इंडस्ट्रीज, एबीबी पॉवर, ट्यूब इन्व्हेस्टमेंट आणि होम फर्स्ट फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टॅक्स मेको रेल आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वधारले, तर लार्सन, पॉवर ग्रिड, जेके पेपर, अशोक लेलँड, कोटक महिंद्रा बँक आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.


शेअर बाजाराचे कामकाज सुरळीत सुरू होऊ शकते, असे संकेत शुक्रवारी निफ्टीकडून मिळाले होते. आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी संमिश्र कल पाहायला मिळाला. शुक्रवारी गिफ्ट निफ्टी किरकोळ बदलांसह कामकाज करत0 होता. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण दिसून आली. प्री ओपम व्यवहारात बीएसई सेन्सेक्स १८५ अंकांच्या वाढीसह ७७६६३ वर तर निफ्टी ९७ अंकांच्या वाढीसह २३६४६ अंकांवर व्यवहार करत होता.

Web Title: Sensex Nifty opens with a bullish start bumper rally in IT stocks GNFC fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.