Opening Bell Today: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं . सकाळच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला होता आणि 72900 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. तर निफ्टी 57 अंकांनी घसरून 22155 अंकांच्या पातळीवर काम करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी फार्मा निर्देशांकात वाढ होत होती तर, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण दिसून आली.
सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान अदानी एंटरप्रायझेस, लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डी, सिप्ला, कोल इंडिया आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर एशियन पेंट्स, टायटन, एचडीएफसी लाइफ एलटी, माइंडट्री टेक, महिंद्रा, टीसीएस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
पेटीएम, जिओ फायनान्शिअल, ओम इन्फ्रा, पंजाब अँड सिंध बँक, पटेल इंजिनियरिंग, ग्लोबल स्पिरिट, लार्सन अँड टुब्रो, देवयानी इंटरनॅशनल, टाटा स्टील, एनएमडीसी लिमिटेड, एचडीएफसी बँक यात तेजी दिसून आली. तर दुसरीकडे आयसीसी प्रुडेंशियल, नेस्ले इंडिया, एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, कामधेनू लिमिटेड, ॲक्सिस बँक, इंजिनियर्स इंडिया, एचडीएफसी लाइफ, टाटा टेक, उर्जा ग्लोबल आणि एशियन पेंट्स यांच्यात घसरण दिसून येत होती.