Join us  

सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; गोदरेज कन्झुमर घसरला, व्हर्लपूलचे शेअर्स वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 9:38 AM

बीएसई सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ७८५५९ अंकांवर तर निफ्टी ५५ अंकांच्या घसरणीसह २३८१३ अंकांवर व्यवहार करत होता.

शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ७८५५९ अंकांवर तर निफ्टी ५५ अंकांच्या घसरणीसह २३८१३ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात व्हर्लपूल इंडिया, केईसी इंटरनॅशनल, अल्ट्राटेक सिमेंट, सीएसबी बँक या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर अमारा राजा बॅटरी, टाटा टेलि, सुप्रीम पेट्रो आणि आर्किन केमिकल या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले.

प्री ओपन मार्केटची स्थिती

गुरुवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ८४ अंकांच्या वाढीसह ७८७५८ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी १३ अंकांच्या वाढीसह २३८८१ अंकांवर व्यवहार करत होता. गुरुवारी सुरू असलेल्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. 

पीएसयू शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या कामात पीएसयू रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली होती. टीटागड रेल, एसजेव्हीएन, रेल विकास निगम, रेलटेल कॉर्पोरेशन, इरेडा, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, इरकॉन इंटरनॅशनल, एनएमडीसी लिमिटेड, टॅक्स मेको रेल, भारत डायनॅमिक्स, आयआरसीटीसी, गेल इंडिया, एनएचपीसी, गार्डन रीच शिपबिल्डर्स, कंटेनर कॉर्पोरेशन, एनटीपीसी आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते, तर हिंदुस्थान पेट्रोलियम, राइट्स लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, कोचीन शिपयार्ड, कोल इंडिया, पॉवर ग्रिड आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. गुरुवारी कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, एशियन पेंट्स, लार्सन, ओएनजीसी, पॉवर ग्रिड, जेके पेपर, विप्रो, टीसीएस आणि एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

 

टॅग्स :शेअर बाजार